News Flash

सोलापुरात माय-लेकाचा विहिरीत बुडून मृत्यू

ही घटना आज दुपारी उघडकीस आली.

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर येथील विजापूर रस्त्यावरील हत्तूर गावातील भिटे वस्ती येथील विहिरीमध्ये माय-लेकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज (सोमवारी) दुपारी उघडकीस आली.

करिना रियाज शेख (वय २४) आणि आबुजैद रियाज शेख (वय ४ महिने, रा. भिटे वस्ती, हत्तूर) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. करिना आणि रियाज शेख यांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. लग्नानंतर त्यांना मुलगा झाला असून पती रियाज हा मजुरीचे काम करतो.

सोमवारी दुपारी भिटे वस्ती येथील विहिरीमध्ये करिना आणि मुलगा आबुजैद या दोघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला. याची माहिती विजापूर नाका पोलिसांना मिळताच त्यांनी दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 10:39 pm

Web Title: mother and son dies in well in solapur
Next Stories
1 ‘आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असे म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक’
2 गुजरातचा निकाल म्हणजे सामान्य जनता मोदींच्या पाठिशी असल्याचा पुरावा- फडणवीस
3 राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावणार
Just Now!
X