17 July 2019

News Flash

धक्कादायक! अमरावतीत १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आईनेही दिली नराधमाची साथ

मायानगर परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीची आई एका शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करायची. तर महेंद्र हा तिथे शिपाई म्हणून काम करायचा.

प्रतिकात्मक छायाचित्र

अमरावतीमध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ४८ वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व कृत्यामध्ये नराधमाला पीडितेच्या आईचीही साथ होती. महेंद्र पिठे (वय ४८) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी महेंद्र आणि पीडित मुलीच्या आईला अटक केली आहे.

मायानगर परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीची आई एका शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करायची. तर महेंद्र हा तिथे शिपाई म्हणून काम करायचा. कामाच्या ठिकाणीच या दोघांची ओळख झाली होती. पीडितेच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून पीडित मुलगी तिच्या आई आणि भावासह राहते. महेंद्र हा पीडितेच्या आईचा मानलेला भाऊ होता. मात्र, महेंद्रची मानलेल्या बहिणीच्या मुलीवरच वाईट नजर होती. तो पीडितेच्या घरी गेल्यावर वारंवार तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करायचा. पीडित मुलीने याला विरोधही दर्शवला. तिने सर्वप्रथम आईला हा प्रकार सांगितला. मात्र, आईने मुलीची बाजू घेण्याऐवजी महेंद्रची साथ दिली. ‘महेंद्रला सहकार्य कर’ असे तिने मुलीला सांगितले. या सर्व प्रकाराने ती हतबल झाली होती.गेल्या दोन वर्षांपासून महेंद्र तिच्यावर बलात्कार करत होता. अखेर या जाचाला कंटाळलेल्या पीडितेने धाडस दाखवले आणि राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही अटक केली आहे.

First Published on December 7, 2018 9:25 am

Web Title: mother helps 48 year old friend to rape her 16 year old daughter in amravati arrested