09 March 2021

News Flash

दोन चिमुकल्यांची हौदात बुडवून हत्या, निर्दयी मातेला अटक

ही घटना बीडमधील नरसोबा नगर येथे घडली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी केली जात आहे.

बीड येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका निर्दयी मातेने आपल्या ३ वर्षांची मुलगी आणि ४ महिन्यांच्या चिमुकलीची पाण्याच्या हौदात बुडवून निर्घृण हत्या केली आहे.

कौटुंबिक वादातून एका महिले आपल्या पोटच्या दोन मुलींना घरातील हौदात बुडवून मारले. ही घटना बीड शहरातील नरसोबा नगर भागात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दीपा राधेश्याम आमटे (वय २३) असे या निर्दयी मातेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली आहे.

घरातील वाद आणि चारित्र्यावर पती सातत्याने संशय घेत असल्याने तणावत असलेल्या दीपाने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. दीपाचा पती हा रिक्षा चालवतो. सोमवारी घरातील सर्व व्यक्ती बाहेर गेले होते. पतीही रिक्षा घेऊन गेला होता. रात्री घरी आल्यावर राधेश्यामला पत्नी आणि दोन्ही मुली दिसल्या नाहीत. त्यांनी शोध घेतला, पण त्या सापडल्या नाहीत. अखेर त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळी पाणी घेताना हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना याची माहिती समजताच त्यांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून निर्दयी मातेला अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 9:27 am

Web Title: mother murdered her 2 small daughter in beed
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
2 वल्लभभाईंना तरी कसे पटेल? : राज ठाकरे
3 मराठी संगीत विश्वातील ‘देव’ हरपला, यशवंत देव यांचे निधन
Just Now!
X