27 February 2021

News Flash

“… ही म्हणजे लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी स्थिती”

सत्तारांच्या राजीनाम्यानंतर खासदार गिरीष बापट यांचा चिमटा

मी स्वत: कोणतीही बातमी ऐकली नाही. मी ऐकीव बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाही. परंतु असं घडू शकतं हे नाकारता येत नाही. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली आहे, असं म्हणत खासदार गिरीष बापट यांनी भाजपाला चिमटा काढला. अब्दुल सत्तार यांनी आज (शनिवार) आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीला लागलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, अशातच त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धोका मानला जात आहे.

मी अशी बातमी ऐकली नाही. सरकारनं अद्यापही खातेवाटप केलं नाही. सत्तार यांनी का राजीनामा दिला हे माहित नाही. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली आहे. तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकतं. सरकारमध्ये काय चलबिचल सुरू आहे हे यातून दिसून येतं, असं बापट यावेळी म्हणाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणं हा संदेश आजवर सरकारच्या माध्यमातून गेला आहे. परंतु भविष्यात काय होईल याची चुणूक यातून दिसते.तीन पक्षांचं सरकार आपल्या तत्त्वांशी तडजोड करून सत्तेवर आलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान देणार असल्याची त्यांना आशा होती. परंतु शिवसेनेकडून त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं. तर पैठणचे आमदार संदीप भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं सत्तार नाराज होते. परंतु खातेवाटपापूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 12:41 pm

Web Title: mp bjp girish bapat criticize mahavikas aghadi government after shiv sena abdul sattar resignation jud 87
Next Stories
1 खातेवाटप न झाल्यानं उघड नाराजी : हरिभाऊ बागडे
2 अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले …
3 जैसी करनी वैसी भरनी; सत्तारांच्या राजीनाम्यानंतर मुनगंटीवारांचं सुचक वक्तव्य
Just Now!
X