17 February 2020

News Flash

…तोपर्यंत फेटा बांधणार नाही, खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार

राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी हा निर्धार व्यक्त केला

(संग्रहित छायाचित्र)

“बीडमधील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही”, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त आंबेजोगाई येथे आयोजित सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे.

“शिवस्वराज्य यात्रा  परळीहून अंबाजोगाईला आली असता,  ‘परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही . तसेच जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन”, असे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी आयोजित सभेत केले. राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा यांनी फेटा बांधण्यास घेतला असता त्यास नकार देत कोल्हे यांनी वरील निर्धार व्यक्त केला. एकप्रकारे केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा आणि परळीतून धनंजय मुंडे निवडून येत नाहीत तोपर्यंत बीडमध्ये फेटा घालणार नाही, असा निश्चय कोल्हे यांनी बोलून दाखवला आहे.

विधानसभेसाठी परळी मतदारसंघात भाजपाच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची लढत त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे . पंकजा या २००९ पासून परळी येथे आमदार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणारी लढत अटीतटीची ठरणार आहे.

 

First Published on August 25, 2019 1:25 pm

Web Title: mp dr amol kolhe pledges not to wear feta unless parali and kej gets ncp mla in vidhansabha election sas 89
Next Stories
1 जळगावमध्ये मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या
2 प्रस्तावित तेल रिफायनरी क्षेत्रात जमीन घोटाळा
3 रेल्वेच्या सहा जलाशयांची संरचनात्मक तपासणी
Just Now!
X