खा. डॉ. विखे यांचा राज्य सरकारला टोला

नगर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्र्यामध्ये कोणते खाते मिळाले यावरुन कुरु बुरी सुरू आहेत. खातेवाटपावरुन एवढे वाद असतील तर एखादा निर्णय घेण्यावरुन सरकारमध्ये किती वाद होतील? खात्यामुळे व्यक्तीची ओळख नको तर व्यक्तीमुळे खात्याला ओळख मिळाली पाहिजे. जनतेचे सेवक म्हणून घेणाऱ्यांनी मला हे खाते नको म्हणण्याची गरज नाही. मलईदार खात्यासाठी एवढा आटापिटा करण्याऐवजी, त्यांना जर मलईच कमवायची असेल तर त्यांनी मंत्री नव्हे ठेकेदारच व्हावे असा टोला भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आज, सोमवारी लगावला.

केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारमधील खाते वाटपावरून निर्माण झालेले वाद, नाराजी या पाश्र्वभूमीवर ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देतील, असे वक्तव्य केले होते. खा. विखे यांचे याकडे लक्ष वेधले असता, गडाख यांच्या भूमिकेला दुजोरा देत ते म्हणाले, गडाख हे माझे मार्गदशर्क नेते आहेत. मीही त्यांना राजकीय गुरु च मानतो. वैचारिक दृष्टिकोन असलेल्या त्यांच्यासारख्या नेत्याने केलेल्या वक्तव्याला माझे समर्थनच आहे. राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. नेत्यांची मने जुळली असली, तरी खाली कार्यकर्त्यांंची जुळलेली नाहीत. नगरसारख्या ठिकाणी शिवसेनेने एखादा प्रकल्प मंजूर करु न आणला तर राष्ट्रवादी त्याला समर्थन देऊ शकत नाही, अशी परिस्थिती असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

खा. विखे म्हणाले की, आज तीन पक्षांचे सरकार आले आहे. ते कसे आले हे सगळ्यांना माहिती आहे. ते सांगायची आवश्यकता नाही. तसेच आज शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सरकारने केले पाहिजे, कर्जमाफीची घोषणा झाली मात्र त्याबाबत रोजच नवे शासन निर्णय निघत आहे. अतिवृष्टीबाबत शेतकऱ्यांना वाढीव पैसेही मिळाले नाहीत, अशा परिस्थिती सरकारमधील मंत्र्यांमध्ये जे नाराजी नाटय़ सुरु  आहे, खाते वाटपावरून एवढा गोंधळ आहे, उद्या एखाद्या निर्णयासंदर्भात तीन वेगळ्या पक्षांमध्ये एकमत कसे होईल हाही चर्चेचा विषय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराज यांच्याबरोबर भाजपकडून तुलना केली जाते, याबाबत विचारलेल्या मनपातील गैरव्यवहाराबद्दल इशारा

राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील प्राजक्त तनपुरे आता नगरविकास खात्याचे मंत्री झाले आहेत, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसवाले त्यांच्याकडे जाऊ शकत नाहीत, त्यांची अडचण आहे, मग आपणच तनपुरे यांच्याकडे जाऊन मनपामधील अभियंत्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी जाऊ असाही टोला, खा. विखे यांनी मनपामधील आढावा बैठकीत लगावला. अभियंत्यांच्या रिक्त पदांमुळे कामकाजात अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणले. त्यासंदर्भात विखे यांनी हा टोला लगावतानाच पाठपुरावा करण्याचेही आश्वासन दिले. फेज-२, अमृत पाणी व भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजना, छावणी मंडळाच्या जागेवरील झोडपट्टय़ांच्या जागेचा प्रश्न आदी योजना रखडल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नेहरु  मार्केट व प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुल या दोन्ही वास्तू मनपाने स्वत:च बांधाव्यात, त्यासाठी डिझाईन तयार करावे, अशी सूचना करताना त्यांनी मनपातील गैरव्यवहारांबाबत मी स्वत:च जनहीत याचिका दाखल करेल, असा इशाराही दिला. मनपातील गैरव्यवहाराबद्दल इशारा

राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील प्राजक्त तनपुरे आता नगरविकास खात्याचे मंत्री झाले आहेत, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसवाले त्यांच्याकडे जाऊ शकत नाहीत, त्यांची अडचण आहे, मग आपणच तनपुरे यांच्याकडे जाऊन मनपामधील अभियंत्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी जाऊ असाही टोला, खा. विखे यांनी मनपामधील आढावा बैठकीत लगावला. अभियंत्यांच्या रिक्त पदांमुळे कामकाजात अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणले. त्यासंदर्भात विखे यांनी हा टोला लगावतानाच पाठपुरावा करण्याचेही आश्वासन दिले. फेज-२, अमृत पाणी व भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजना, छावणी मंडळाच्या जागेवरील झोडपट्टय़ांच्या जागेचा प्रश्न आदी योजना रखडल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नेहरु  मार्केट व प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुल या दोन्ही वास्तू मनपाने स्वत:च बांधाव्यात, त्यासाठी डिझाईन तयार करावे, अशी सूचना करताना त्यांनी मनपातील गैरव्यवहारांबाबत मी स्वत:च जनहीत याचिका दाखल करेल, असा इशाराही दिला.