31 October 2020

News Flash

पेण बँकेच्या विलिनीकरणासाठी पुन्हा प्रयत्न

खासदार सुनील तटकरे यांची माहिती

खासदार सुनील तटकरे यांची माहिती

अलिबाग : पेण अर्बन बँके घोटाळ्याचा तपासयंत्रणांचे सुरुच राहील मात्र दुसऱ्या बाजूला या बँकेचे एखाद्य सशक्त बँकेत विलिनीकरण करण्यासाठी यथायोग्य प्रस्ताव तयार करा, अशा सुचना खासदार सुनील तटकरे यांनी संबधित यंत्रणांना दिल्या आहेत. बँकेचे ठेविदार आणि प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक नुकतीच अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साडे सातशे कोटींच्या बँक घोटाळ्यामुळे पेण अर्बंन बँक अडचणीत आली आहे. गेली दहा वर्ष बँकेच्या कामकाजावर रिजव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे जवळपास दोन लाख ठेविदारांच्या पाचशे कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. या पार्श्वभुमीवर तटकरे यांनी हि बैठक घेतली. यावेळी केंद्र सरकारच्या सुधारीत धोरणानुसार बँकेच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न  करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. बँकेच्या घोटाळ्याची चौकशी, न्यायालयीन सुनावणी सुरु राहील, मात्र त्याचे वेळी या बँक सशक्त बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न  सुरु करता येऊ  शकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठेवीदार संघर्ष समितीचे ४० सदस्य यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री रोजगार योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. पेणच्या गणेशमुर्ती व्यवसायाला नवी उभारी देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकानी या योजने आंतर्गत गणेश मुर्तीकारांना पाठबळ द्यावे. १५ दिवसात बँकांनी गणेश मुर्तीकारांकडून अर्ज भरून घ्यावेत आणि निसर्ग वादळामुळे अडचणीत आलेल्या या व्यवसायाला नव्याने उभारी द्यवी अशा सुचना प्रशासकीय यंत्रणा आणि बँक प्रतिनिधींना केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचा अलिबाग तालुका स्तरीय मेळावा भाग्यलक्ष्मी हॉल येथे पार पडला.  यावेळी आमदार अनिकेत तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती गीता पालरेचा, यांच्यासह तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे उपस्थित होते. यावेळी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना करोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीनंतर शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीत दुरावा आला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी तटकरे यांना विचारला त्यावर उत्तर देताना शेकाप आणि आमदार जयंत पाटील यांनी का धरला मजवरी हा राग..हे मला महित नाही, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महाआघाडीची स्थापना झाली त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व मित्र पक्षांनी महाआघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात शेकाप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही समावेश होता. त्यामुळे शेकाप महाआघाडी सोबतच आहे. मध्यंतरी आमदार जयंत पाटील यांनी अशी भुमिका मांडली होती. त्यामुळे जीवनात ही घडी अशीच राहू दे म्हणत अस म्हणत शेकापला पुन्हा एकदा साद घातली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 3:09 am

Web Title: mp sunil tatkare try for merger of pen urban bank zws 70
Next Stories
1 रत्नागिरीत ८०० चाचण्यांमध्ये १८ करोनाबाधित
2 पीक विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिसाद नाही
3 उजनीच्या पाणी व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे पूरस्थिती?
Just Now!
X