साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद जगजाहीर असला तरी जावली तालुक्यातील कुडाळ येथे उपस्थितांना वेगळेच चित्र पाहायला मिळाले. कुडाळमधील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे समोरासमोर आले आणि दोघांनीही वाद विसरुन हस्तांदोलन करत सर्वांनाच धक्का दिला. यानंतर एकमेकांना कोपरखळया मारल्या. या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे.

सातारा येथे शिवेंद्रसिंहराजे यांच्या घरासमोरील धुडगूस, आनेवाडी टोल नाका प्रकरण, जावळीतील जिल्हापरिषद निवडणुकीतील दगडफेक, त्याचबरोबर साताऱ्यातील राजकीय कलगीतुरा आणि दोघांच्या समर्थकांमधील रोषाचे वातावरण अशा अनेक घटनांमधून या भागातील जनतेने खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे दोन्ही ‘राजे’जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा सर्वांचेच त्याकडे लक्ष असते.

Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
Sambhaji Bhide Meets Devendra Fadnavis in Sangli
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानात संभाजी भिडेंनी नेमकं काय सांगितलं? चर्चांना उधाण
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray in Ramtek Lok Sabha constituency campaign
बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, ‘हे’ घरगडी समजत होते; एकनाथ शिंदे यांची टीका

जावली तालुक्यातील कुडाळ येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमने- सामने आले. दोन्ही राजेंना पाहून आता काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण दोघांनीही हस्तांदोलन करत सर्वांनाच धक्का दिला. दोघेही यावर थांबले नाहीत.

उदयनराजे हे शिवेंद्रराजे यांच्या समोर जात त्यांच्या खांद्यावर हात ठेवून खांदा दाबू लागले. त्याचवेळी शिवेंद्रराजे यांनी ‘खासदार साहेब माझा सारखा खांदा का दाबता’ अशी विचारणी केली. यावर उदयनराजेंनी डोळा मारत मिश्किलपणे सांगितले की, बघतोय खांदा किती मजबूत आहे. उदयनराजे यांच्या या  उत्तराला प्रत्युत्तर देताना शिवेंद्रराजे यांनी आपला खांदा मजबूत असल्याचे सांगितले. हवे तर प्रात्यक्षिक दाखवतो असे त्यांनी सांगितले. या दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली. या भेटीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहे.