News Flash

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरळीत

शहरातील १७ केंद्रांवर रविवारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पार पडली. या परीक्षेला ६ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. ५ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे

| May 19, 2014 01:54 am

शहरातील १७ केंद्रांवर रविवारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पार पडली. या परीक्षेला ६ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. ५ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे सांगण्यात आले. पहिल्यांदाच या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला होता. पूर्वी दीडशे गुणांसाठी ही परीक्षा घेतली जात असे. या वर्षी १०० गुणांसाठी एक तास असे परीक्षेचे स्वरूप होते.
गणित या विषयाला पर्याय म्हणून माहिती व तंत्रज्ञान हा विषय देण्यात आला होता. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित असणाऱ्या प्रश्नपत्रिकेतील उत्तर चुकले की, गुण कमी केले जातात. दीडशे प्रश्नांसाठी ३०० गुणांची परीक्षा पूर्वी होत असे. या वेळी मात्र बदल करण्यात आले होते. शहरातील १७ केंद्रांवर सकाळी ११ ते १२ या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. ती सुरळीत पार पडल्याचा दावा करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 1:54 am

Web Title: mpsc exam aurangabad
टॅग : Aurangabad,Mpsc Exam
Next Stories
1 अपक्षांच्या खात्यात १ लाख ३७ हजार मते
2 पित्याच्या अपमानानंतर नववधूची वराला अद्दल!
3 बीडमध्ये ३७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
Just Now!
X