News Flash

MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित, करोनामुळे राज्य सरकारचा निर्णय

प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

करोना या साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठीच्या Epidemic Act,1897 या कायद्याची अमलबजावणी राज्यात करण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर राज्यातील MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आल्या आहेत.

राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, “राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे.”

राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवलेले पत्र.

या पत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला स्पष्ट सांगण्यात आले आहे की, “करोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या गर्दीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२० पर्यंत आपल्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. अशा सूचना आपणास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने देण्यात येत आहेत. तरी त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.”

त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत कोणत्याही प्रकारची एमपीएससी परीक्षा घेतली जाणार नाही. अशाच आशयाचे टि्वटही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 6:18 pm

Web Title: mpsc exams postponed due to corona virus pkd 81
Next Stories
1 … तर करोनाबाधित रुग्णांना नजरकैदेत ठेवणार; आरोग्यमंत्री टोपे
2 बैलगाडीतून जाताना अचानक वाघानं घातली झडप, वृद्ध ठार
3 Coronavirus : सोलापूर, मिरज, पुणे या ठिकाणी नव्या लॅब उभारण्यात येणार-राजेश टोपे
Just Now!
X