पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) शनिवार (१३ जुलै) ते सोमवार (१५ जुलै) दरम्यान राज्य सेवा मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेशपत्र आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे. मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ प्रवेशपत्र परीक्षेसाठी सोबत असणे अनिवार्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उमेदवाराने प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा केंद्रावर, तर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. . तसेच परीक्षेला येताना मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून आवश्यक आहे.