मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची आज बैलगाडीत बसण्याची हौस पूर्ण झाली असून लहान पणापासूनची इच्छा आज पूर्ण झाल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी बैलगाडीत बसून थोडावेळ बैलगाडी हाकली देखील. पिंपरी-चिंचवड मधील इंद्रायणी थडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

भोसरी मध्ये आयोजित इंद्रायणी थडीत आज अमृता फडणवीस आल्या होत्या,तेव्हा मुख्य कार्यक्रमाच्या अंतरापासून त्यांना बैलगाडीत बसवून घेऊन जाण्यात आले.यावेळी त्यांनी काही क्षण अमृता फडणवीस यांनी बैलगाडी चालवली. भाषणात अमृता फडणवीस यांनी त्या क्षणांचा आवर्जून उल्लेख करत बैलगाडीतून प्रवास हा लहानपणापासूनची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली असून पुढील वेळेस बैलगाडीत बसून शेतात जायलाही आवडेल असंही त्या म्हटल्या.

पुढे त्या म्हणाल्या की,आज अस लोकांचा विचार करणारे नेते खूप कमी आहेत.स्त्रियांनी गुणवत्ता दाखवणे खूप गरजेचं आहे.आपल्या आवडीनुसार जगावं.देश पुढे जाईल, सोनेरी चिडीया बनेल तेव्हा स्त्रियांच कर्तृत्व महत्वाचं असेल मुलगा आणि मुलगी याना समान वागणूक देणे गरजेचे आहे असं देखील त्या म्हणाल्या.