अलिबाग व पेण तालुक्यात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून विद्युत मीटर उपलब्ध होत नसल्याने वीजग्राहकांमध्ये कमालीची नाराजी आहे. तब्बल ३५० ग्राहकांना अजूनही मीटरच्या प्रतीक्षेत असून या दोन तालुक्यांसाठी १५ हजार मीटरची मागणी करण्यात आली आहे.

विद्युत वितरण कंपनीचे जाळे शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी पसरते आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील दऱ्याखोऱ्यात ग्राहकांच्या मागणीनुसार विद्युत वितरण कंपनी ग्राहकांना सेवा पुरवीत आहे. तसेच ग्राहकांच्या सोयीसुविधांसाठी विविध उपक्रमही राबविले जात आहेत. अलिबाग व पेण या तालुक्यातील सुमारे दीड लाखांच्या आसपास विद्युतग्राहक आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे ग्राहकांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढत्या संख्येमुळे विद्युत मीटरसाठी मागणीही मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. अलिबाग, पेण तालुक्यांत गेल्या दोन-अडीच महिन्यांत एक हजारच्या आसपास ग्राहकांनी विद्युत मीटरसाठी मागणी केली. त्यापकी आतापर्यंत ६५० विद्युत मीटर देण्यात आले आहेत. मात्र ३५० ग्राहकांनी पसे भरूनही त्यांना मीटर मिळालेले नाहीत. पुरेसे मीटर उपलब्ध नसल्याने मीटर देण्यात आले नाहीत. येत्या आठ दिवसांत सर्वाना मीटर उपलब्ध होतील, असे या यंत्रणेकडून सांगण्यात आले. अलिबाग व पेण तालुक्यांसाठी एकूण १५ हजार मीटरची मागणी करण्यात आली असून लवकरच वरिष्ठ स्तरावरून मीटर उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

२१ टक्के वीजगळती

अलिबाग व पेण तालुक्यात चालू वर्षांत २१.५ टक्के वीजगळती असल्याची माहिती उघड झाली आहे. संबंधित यंत्रणेकडून ग्राहकांपर्यंत वीजभार २१.५ टक्के कमी मिळत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्याचा फटका अन्य ग्राहकांना बसतो आहे. विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा आíथक भरुदड ग्राहकांच्या खिशाला बसू लागला आहे. अनेकदा फ्यूज उडणे, सíव्हस वायर जळणे असे प्रकार होताहेत.

 साडेसात कोटींची थकबाकी

अलिबाग व पेण या दोन तालुक्यांतील घरगुती, व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातील पाचशे रुपयांपेक्षा अधिक विद्युतबिल असलेल्या ५५ हजार १२४ ग्राहकांनी एप्रिल ते नोव्हेंबर या सात महिन्यांच्या कालावधीत विद्युतबिल भरले नाही. त्यामुळे तब्बल ७ कोटी ४९  लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या सर्व ग्राहकांनी जानेवारीअखेपर्यंत विद्युतबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता मुलाणी यांनी केले आहे.

 मोबाइल नंबर अ‍ॅटॅच करा …

अलिबाग व पेण तालुक्यात दीड लाखाच्या आसपास विद्युतग्राहक आहेत. वाढत्या आधुनिकतेच्या दृष्टीने विचार करून सर्व स्तरांतील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, वेळेवर विद्युतबिल भरण्यासाठी, तसेच विद्युत मीटरबाबत काही समस्या जाणवल्यास त्याची माहिती मोबाइलवर मॅसेजद्वारे देण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने मोबाइल क्रमांक विद्युत कंपनीशी अ‍ॅटॅच करण्याचे आवाहन केले आहे.

untitled-3