राज्य परिवहन सेवा आता कॅशलेश होणार आहे. फिनो पेमेंट्स बॅंकेच्या एनएफसी- आधारित टॅप अंड गो कॉन्टॅक्टलेस पेमेंट सोल्युशननमुळे कॅशलेस पद्धतीने तिकीट उपलब्ध होईल. फिनटेक पार्टनरच्या सहयोगाने रोख डिजिटलायझेशनवर लक्ष केंद्रित करणारी नवीन बँक असलेल्या फिनो पेमेंट्स बँकने मास ट्रान्झीट सिस्टम विशेषत: राज्य बस परिवहन सेवांसाठी एनएफसी-आधारित कॉन्टॅक्टलेस पेमेंट सोल्यूशन सादर केले आहे.

राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एसआरटीसी) चालवणा-या बसेस ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील बहुतांश लोकांच्या प्रवासाचे सर्वाधिक पसंत साधन आहेत. या बसेसमध्ये तिकिट खरेदी करण्यासाठी रोख रक्कम वापरली जाते. ग्रामीण भागातील २. ७५ लाख पॉईंट्सच्या बँकिंग नेटवर्कपैकी ८० % नेटवर्क फिनोचे लक्ष्य आहे. सार्वजनिक वापराच्या या सिस्टममध्ये वापरल्या जाणा-या रोख रकमेचे डिजिटायझेशन करण्याची ही मोठी संधी आहे.

कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा फैलाव टाळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुरक्षा वर्धित उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच परिवहन संचालकांनी सोयीस्कर व सुरक्षित अशा प्रभावी पर्यायांचा विचार सुरू केला आहे. एनएफसी-आधारित प्रीपेड स्मार्ट कार्ड सोल्यूशनचा वापर ऑफलाइन भाडे संकलनासाठी देखील केला जाऊ शकतो, जो कनेक्टिव्हिटीच्या समस्या असलेल्या ठिकाणी फायदेशीर आहे. स्वत: च्या बस डेपोसह, एसआरटीसी फिनोच्या राज्य व्यापी बँकिंग नेटवर्कचा टच पॉईंट म्हणून लाभ घेऊ शकतात. जिथे ग्राहकांना स्मार्ट आणि कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा प्रकारे रीचार्ज करण्याची सुविधा आहे. रोखीचे डिजिटलीकरण झाल्यामुळे कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट्स मुख्यत्वे रोख आधारावर असलेल्या व्यवसायांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यास मदत करते.