News Flash

म्युकरमायकोसिसची परिस्थिती चिंताजनक,अधिक औषधे पुरवा; राजेश टोपेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

राज्यात या आजाराने आत्तापर्यंत ९० मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस हा आजार सध्या राज्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे राज्याला या संदर्भातल्या औषधांचा पुरवठा वाढवण्याची मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

पंतप्रधान मोदींनी आज राज्याच्या १७ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी टोपे बोलत होते. या बैठकीसाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हेही उपस्थित होते. टोपे यांनी राज्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना सांगितलं की, राज्यातली रुग्णसंख्या कमी झाल्याने आता ऑक्सिजन आणि रेमडेसिविर या दोन्हींचीही कमतरता नाही. पण आता राज्यासमोर म्युकरमायकोसिस आजाराचा मुख्य प्रश्न उभा राहिला आहे.

राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्रात आता म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या Amphotericin-B या प्रमुख औषधाची कमतरता आहे. राज्याला या औषधाच्या दीड ते दोन लाख कुप्यांची गरज आहे. पण केंद्राकडून मात्र केवळ १६ हजार कुप्या राज्याला मिळालेल्या आहेत.

हेही वाचा- “जर राज्यांना बोलण्यास परवानगी नव्हती तर बोलवलं कशाला?”

राज्यात आत्तापर्यंत या आजाराचे १५००रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ८५०रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ९० रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

या बैठकीनंतर टोपे यांनी माध्यमांसी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, मी केंद्राला म्युकरमायकोसिससंदर्भातल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. तसंच या आजाराच्या उपचारासाठी अधिक औषधांची मागणीही केली आहे. राज्यातल्या करोनाबाधितांची संख्या आता कमी होत असल्याने आता ऑक्सिजन आणि रेमडेसिविरची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळे तो आता चिंतेचा मुद्दा राहिलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 5:15 pm

Web Title: mucormycosis is the main concern for state provide more medicines for it rajesh tope to center vsk 98
Next Stories
1 Cyclone Tauktae : “हा भेदभाव का? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली काही जबाबदारी नाही का?”
2 लसीचा दुसरा डोस ३० दिवसानंतर कसा मिळाला?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला खुलासा
3 “कोकणाने शिवसेनेला खूप दिलं, आता शिवसेनेने देताना हात आखडता घेऊ नये”- देवेंद्र फडणवीस
Just Now!
X