News Flash

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातही वाहतुक कोंडीचे विघ्न

मुंबई-गोवा महामार्गावरील संग्रहित छायाचित्र.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील लाखो चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. कोकणात जातांना त्यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब केला होता. मात्र मुंबई पुणे दृतगती मार्गावर झालेल्या कोंडीमुळे ते अडकून पडले होते. हा अनुभव लक्षात घेऊ गौरीगणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब टाळला. त्यामुळे मंबई गोवा महामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली. यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली.

दासगाव ते माणगाव या दरम्यान मुंबईच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तीस ते चाळी किलोमिटर परीसरात वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. माणगाव बाजारपेठ, लोणेरे नाका, टोल फाटा, इंदापुर बाजारपेठ हि वाहतुक कोंडीची मुख्य केंद्र होती.

वाहनांची प्रमाणाबाहेर वाढलेली संख्या, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहन चालक, अपुरा पोलीस बंदोबस्त आणि किरकोळ अपघात या वाहतुक कोंडीस कारणीभुत ठरल्याचे दिसून आले. वडखळ नाका, रामवाडी परिसर आणि खोपोली बायपास या पट्ट्यातील वाहतुक नियंत्रित ठेवण्यात पोलीसांना यश आले असले तरी दासगाव ते इंदापुर या पट्ट्यात वाहतुक निंयत्रित ठेवण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरले. काही वाहन चालकांचा आतताई पणाही या वाहतुक कोंडीला कारणीभुत ठरला. महामार्गाची दुरवस्था आणि रुंदीकरणाच्या कामामुळे अरुंद झालेले रस्ते यांनी वाहतुक कोंडीत अधिकच भर घातली.

गणेशोत्सवकाळात महामार्गावरील वाहतूक प्रचंड वाढत असते. याकाळात दोन हजार एसटी बसेस आणि तेवढ्याच खाजगी बसेस याकाळात महामार्गावर सोडल्या जातात. याशिवाय १५ ते २० हजार खाजगी वाहन दररोज महामार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे वाहनांची संख्या अधिकच वाढते. महत्वाची गोष्ट म्हणजे हा महामार्ग अरुंद असल्याने वाहतुकीचे योग्य नियमन करणे गरजेच असते. याचा अनुभव गाठीशी असूनही यावर्षी महामार्गावर परतीच्या प्रवासात अपुरा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचा आरोप चाकरमान्यांनी केला. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने दुपारनंतर महामार्गावरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, सुधागड पाली, तळा, येथून जादा पोलीसांची कुमक मागविण्यात आली. कोलमडलेली वाहतुक निंयत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र संध्याकाळी उशीरा पर्यंत कोंडी सुटू शकली नव्हती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 8:40 pm

Web Title: mumbai goa highway slowed down
Next Stories
1 ‘संजय गांधी निराधार’सह अन्य योजनांना अनुदानवाढीची प्रतीक्षा
2 साताऱ्यात घरगुती गणपतींचे विसर्जन
3 स्थायी सभापती मारहाणप्रकरणी उपमहापौर व दोघा पुत्रांवर गुन्हा दाखल
Just Now!
X