मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली असून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील आणि नोकरीतील मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असून राज्य सरकारला आरक्षण जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. मात्र १६ टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये १२ ते १३ टक्के मर्यादा आणली पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षण वैध, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

#MarathaReservation: १६ टक्के आरक्षण हवे, १२ ते १३ टक्के नाही – सुभाष देशमुख

आरक्षण गेलं खड्ड्यात; छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप

संभाजीराजे छत्रपती यांनी निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ‘मुख्यमत्र्यांनी अत्यंत योग्यपणे भूमिका मांडली. मराठा आरक्षण मिळावं यासाठी सरकारने अगदी प्रामाणिक प्रयत्न केले’. यावेळी त्यांनी १६ की १२ टक्के हा मुद्दा नसून आरक्षण टिकलं हे महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. मराठा समाजाने आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपुर्वी आरक्षण गेलं खड्ड्यात असं ट्विट केलं होतं. यावर बोलताना ती माझी संतापाची भावना होती असं सांगितलं. पण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे अशी शाहू महाराजांची भूमिका होती. बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मराठा समाजाचे घटक आणि नंतर मुख्यमंत्र्यांना फोन करुन आपण अभिनंदन करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण-मुख्यमंत्री
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कोर्टाने दिलेल्या निकालातले मुद्देही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवले. मुख्यमंत्र्यांनी कोर्टाचा निर्णय जाहीर करताच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या. मराठा बांधवांनी जो लढा दिला त्याचं हे यश आहे. तसंच मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल दिला त्या अहवालाने सर्वात महत्त्वाची भूमिका या सगळ्या प्रक्रियेत पार पडली असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.