नागपूरहून भुसावळकडे लोखंडी पत्रे घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे मागील पाच डबे बोदवड रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घसरल्याने हावडा आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे बोदवड मुक्ताईनगरमार्गे बुऱ्हाणपूर रस्ता मार्गावरील वाहतूकही बंद पडली.
महाराष्ट्र एक्स्प्रेस बोदवड स्थानकातून मलकापूरकडे रवाना झाल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. या अपघातामुळे मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. गार्ड डब्यापासून आधीच्या पाच डब्यांपैकी एक डबा जाणाऱ्या तर उर्वरित चार डबे येणाऱ्या मार्गावर घसरल्याने दोन्ही मार्गावरचे रूळ उखडले गेले. अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नाही. मात्र या अपघातामुळे हावडा आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद पडली. या मार्गावरून जाणाऱ्या मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा, हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, चेन्नई-एगमोहर-जोधपूर एक्स्प्रेस आणि गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस या पाच गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याशिवाय भुसावळ-वर्धा पॅसेंजर रद्द करण्यात आली, तर नागपूर-भुसावळ पॅसेंजर मलकापूर येथेच थांबविण्यात आली. तसेच हा अपघात बोदवडच्या रेल्वे फलाटाजवळ झाल्याने राज्य मार्ग क्रमांक आठवरील बोदवड मुक्ताईनगरमार्गे बुऱ्हाणपूर मार्गावरील रस्ता वाहतूकही बंद पडली.
घटनास्थळी रेल्वेचे भुसावळ मंडल प्रबंधक महेशकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ  अधिकारी पोहोचले असून रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर कार्य सुरू करण्यात आले आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द