25 October 2020

News Flash

उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे

(संग्रहित छायाचित्र)

रविवारी काही ठिकाणी शिंपडल्यानंतर मंगळवारी 11 जून रोजी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वेधशाळांच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई व किनारी भागामध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अरबी समुद्रात दक्षिण-पूर्व भागात व लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे व येत्या 48 तासांमध्ये त्याची व्याप्ती वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे कोकणासह मुंबईमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो तसेच वादळी वारे वाहू शकतात असा अंदाज आहे.

Next Stories
1 बॉम्बस्फोटातल्या आरोपींना तिकीट देणं हा लोकशाहीवरचा हल्ला-शरद पवार
2 पीकविमा कंपन्यांना सरळ करू
3 धानोरकरांनी पवारांचे आभार मानल्याने काँग्रेस अस्वस्थ
Just Now!
X