अंगराकी संकष्टीनिमित्त भाविकांनी आज (मंगळवारी) राज्यभरातील सर्व गणपती मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. यावर्षी केवळ एकमेव संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मुंबईतील दादर परिसरात असलेल्या सिद्धीविनायक मंदिरातही भाविकांनी रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

यावर्षी असलेल्या केवळ एकमेव अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. तर येत्या वर्षात एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी नाही. त्यामुळे आता पुढील अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 2021 मध्ये येणार आहे. भाविकांना आता अंगारकी संकष्टी चतुर्थीनंतर भाविकांना तब्बल दीड ते दोन वर्षांनी वाट पहावी लागणार आहे.

दरम्यान, भाविकांची गर्दी पाहता आणि कोणत्याही प्रकारची अनुचित घटना न पाहता सिद्धीविनायक मंदिरात पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसंच मंदिरात येणाऱ्यांची कसून तपासणीही केली जात आहे. दरमयान, मंदिराला रोषणाईदेखील करण्यात आली आहे. मुंबई व्यतिरिक्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरातदेखील दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर दुसरीकडे गणपती पुळे येथेदेखील भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी आले असून अनेक भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लावल्या आहेत.