मिरा रोड पोलिसांकडे एका २९ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या घरच्यांविरोधात नवविवाहितेने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. नया नगर पोलीस स्थानकामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली असून नवऱ्याला टक्कल असल्याची माहिती आरोपीने आणि त्याच्या घरच्यांनी आपल्याला लग्नाआधी दिली नाही असं या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

नया नगर पोलीस स्थानकातील वरिष्ठ निरिक्षक कैलास बर्वे यांनी हिंदुस्तान टाइम्सशी या प्रकरणासंदर्भात बोलताना आरोपी आणि फिर्यादी दोघांचेही सप्टेंबर महिन्यामध्येच लग्न झाल्याचं सांगितलं. “या प्रकरणातील मुख्य आरोपी हा चार्टड अकाऊटंट आहे. आरोपी आणि फिर्यादीचे सप्टेंबर महिन्यात लग्न झालं. त्यानंतर या महिलेला आपल्या पतीला टक्क असून तो विगचा वापर करतो हे लक्षात आलं,” असं बर्वे यांनी सांगितलं.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

यासंदर्भात या महिलेने आपल्या सासरच्या लोकांकडे आक्षेप नोंदवत पतीला टक्कल असल्याची माहिती तुम्ही माझ्यापासून लपवल्याचा आरोप केला. मंगळवारी याचसंदर्भात या महिलेने पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला टक्कल असल्याचं सासरच्यांनी माझ्यापासून लपवलं असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्याचप्रमाणे सासरचे लोकं माझ्याकडे माहेरुन पैसे घेऊन येण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. माझ्या पतीला माझ्याबद्दल संक्षय असून तो माझ्या मोबाईलमधील चॅट आणि कॉल रेकॉर्डही तपासू शकतो असंही या महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पतीने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचाही आरोप या महिलेने केल्याचे माहिती बर्वे यांनी दिली.

“या प्रकरणामध्ये पोलिसांनी या महिलेचा पती आणि त्याच्या पालकांविरोधात कलम ४९८ (एखाद्या विवाहित महिलेच्या गुन्हेगारी हेतूने भुरळ घालणे किंवा तिला ताब्यात घेणे), कलम ३७७ (अनैसर्गिक अत्याचार), कलम ४०६ (विश्वासघात करणे), कलम ५०० (आब्रुनुकसानी) बरोबरच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे,” असंही बर्वे यांनी सांगितलं. या प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मात्र ठाणे न्यायालयाने पतीने पोलिसांना शरण यावे असं म्हटलं आहे.