News Flash

मुंबई : टॉवरला वायरच्या सहाय्याने गळफास घेत पोलिसाची आत्महत्या

काल रात्री घरातून पडले होते बाहेर; सकाळा ग्रामस्थांना आढळला मृतदेह

प्रतिकात्मक छायाचित्र

-दत्तात्रय भरोदे

इलेक्ट्रिक टॉवरला वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन एका मुंबई पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यातील अल्याणी येथे घडली. भरत खापरे (३३) असे या तरुण पोलीस शिपायाचे नाव असून किन्हवली पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील अल्याणी येथे राहणारे भरत शशिकांत खापरे (३३) हे शिपाई  म्हणून गोराई पोलीस ठाण्यात कार्यरत होते. चार – पाच दिवसांपासून ते आजारी असल्याने घरीच होते. मात्र काल रात्री ते घरातून बाहेर गेले. यानंतर आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांना अल्याणी गावापासून काही अंतरावर असलेल्या इलेक्ट्रिक टॉवरला भरत खापरे यांनी वायरच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून खापरे आजारी असल्याने त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 9:02 pm

Web Title: mumbai police commit suicide msr 87
Next Stories
1 ‘सीरम’ने काहीही करून महाराष्ट्राला लस देताना झुकतं माप द्याव – आरोग्यमंत्री टोपे
2 उद्यापासून साताऱ्यात संपूर्ण लॉकडाउन; किराणा, भाजीपाल्यासह सर्वकाही बंद
3 “भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ”
Just Now!
X