मुंबई – पुणे आणि मुंबई – नाशिक या मार्गांवर रेल्वेची लोकल सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. मार्गातील घाटक्षेत्र लक्षात घेता त्यासाठी चेन्नई येथील कारखान्यात विशेष लोकलची निर्मिती करण्यात येत असून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष मार्गावर गाडीची चाचणी घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मुंबईवरुन नाशिक आणि पुण्यात लोकल ट्रेनने जाण्याचे स्वप्न आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मुंबई – पुणे आणि मुंबई – नाशिक दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुण्यातून मुंबईसाठी सकाळी आठनंतर दुपारी साडेतीनपर्यंत एकही रेल्वे नाही. त्यामुळे या मार्गावर लोकल सेवा सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. तर मुंबई- नाशिक मार्गावरही लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली जात होती. या लोकल सेवेमुळे मुंबई- पुणे आणि मुंबई – नाशिक मार्गावरील प्रवाशांना कमी खर्चात वेगवान प्रवास करता येईल आणि महामार्गांवरील वाहतुकीचा ताणही कमी होईल.

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

कशी असेल लोकल
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकल गाडीला १६ ऐवजी ३२ ब्रेक असणार आहेत. त्याच प्रमाणे तिच्या इंजिनाची क्षमताही सध्याच्या लोकलच्या तुलनेत अधिक असणार आहे. त्यामुळे घाटक्षेत्रातून ही गाडी सहज धावू शकेल.