28 February 2021

News Flash

मुंबई-पुणे महामार्गावर मिनीबसचा अपघात; २ गंभीर जखमी

सुमारे सात जण किरकोळ जखमी

(संग्रहित छायाचित्र)

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात शनिवारी सकाळी मिनीबसचा अपघात झाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली आणि बसमधील प्रवासी जखमी झाले. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिंगरोबा देवस्थानच्या मागील बाजूच्या खिंडीत वळण रस्त्यावर खोपोलीच्या दिशेने उतरताना हा अपघात झाला. बसमधील सर्व प्रवाशी हे पिंपरी चिंचवड परिसरातले असून ते अलिबाग येथे जात होते.

अपघात झालेल्या मिनिबसमध्ये एकूण १७ जण होते. बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली. बोरघाट पोलीस यंत्रणेची संपूर्ण टीम, आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमने तात्काळ मदत केली. गंभीर जखमी झालेल्यांना कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर सहा ते सात किरकोळ जखमींना खोपोली पालिका रुग्णालयात दाखल केले. जर ही बस डावीकडे उलटली असती, तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 11:18 am

Web Title: mumbai pune old highway major accident minibus 2 severely injured raigad pimpri chinchwad vjb 91
Next Stories
1 पालघर दुहेरी हत्याकांडातील आरोपीला मिर्झापूरमधून अटक
2 आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही!
3 जिल्ह्य़ातील ताडी व्यावसायिक हतबल
Just Now!
X