मुंबईत सलग दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा फटका एसटी महामंडळालाही बसला आहे. मुंबईत पाऊस झाल्यानंतर हिंदमाता, अंधेरीसोबत सायन सर्कल परिसरातही पाणी साचतं. दरम्यान, सायन सर्कजवळ पाणी साचल्याने परळ बस स्थानकातून मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या एसटी बसेसना आपल्या मार्गात बदल करावा लागला आहे. सध्या परळ बस स्थानकातून मुंबईच्या बाहेर जाणारी वाहतूक वडाळा मार्गे सुरू आहे.
यासोबतच दादर बस स्थानकातून सकाळपासून 13 फेऱ्या पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. यामधील १० शिवनेरी आहेत. पण प्रवासी गर्दी नसल्याने गाड्यांची वारंवारता कमी करण्यात आली असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
मुंबईकरांना वाचवण्यासाठी नौदलाचे जवान उतरले रस्त्यावर
मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
तसंच रायगड जिल्ह्यातील पाली – नागोठणे या मार्गावरील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग सध्या एसटी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यातील नालासोपारा व अर्नाळा आगारात सूर्या धरणातून सोडलेले पाणी साचल्याने या आगारातील सकाळपासून बस फेरी सुटलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 12:33 pm