मंगळवारी रात्रीपासून मुंबईकरांची दैना उडवणाऱ्या पावसाचा फटका गुरुवारीही बसणार आहे. गुरुवारी मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस आणि पुण्याहून मुंबईला येणारी सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

परतीच्या पावसाने मंगळवारी संध्याकाळपासून मुंबई आणि उपनगराला झोडपले आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली होती. मध्य रेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला, चुनाभट्टी, शीव  येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक उशिराने सुरु आहे. राज्य सरकारने बुधवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. बुधवारी सकाळी पावसाचा जोर बघून अनेकांनी घरात राहणेच पसंत केले. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनमध्ये आज कमी गर्दी होती. ८० टक्के लोकल ट्रेनच आज प्रवाशांच्या सेवेसाठी धावत होत्या. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही पावसाचा परिणाम झाला. काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

या गाड्या रद्द

दिनांक – २० सप्टेंबर
२२१०२-  मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) राज्यराणी एक्स्प्रेस
१२११८ –  मनमाड – लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस
११००७  – सीएसएमटी- पुणे डेक्कन एक्स्प्रेस
२२१०१ –  सीएसएमटी – मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस
१२११७ –  लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड गोदावरी एक्स्प्रेस
११०१० –  पुणे – सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस

दिनांक २१ सप्टेंबर
२२१०२ – मनमाड – सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
११००७ – सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्स्प्रेस
२२१०१- सीएसएमटी – मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस
११०१०- पुणे -सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
१२१२८- पुणे – सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस
१२१२७- सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (२२ सप्टेंबररोजी धावणारी)

या गाड्यांचे मार्ग बदलले
११०२५ – भूसावळ – पुणे एक्स्प्रेस
११०२६ – पुणे – भूसावळ एक्स्प्रेस