बालपणापासूनच मुलांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने चंदिगढमध्ये होणाऱ्या २३व्या ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदे’त महाराष्ट्रातून २७ प्रकल्पांची निवड करण्यात आली असून त्यापैकी सहा प्रकल्प हे मुंबईतील आहेत.

कुडाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत ३०० बाल वैज्ञानिक आणि त्यांचे विज्ञान शिक्षक सहभागी झाले होते. ‘हवा आणि हवामान’ हा परिषदेचा विषय होता. त्यात ६६ विज्ञान संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. जिल्हा स्तरावर सहभागी झालेल्या २५०० प्रकल्पांच्या कडक चाळणी परीक्षेतून हे २७ प्रकल्प निवडण्यात आले आहेत. यात मुंबईच्या सहा, ठाण्याच्या पाच, धुळ्याच्या तीन आणि नवी मुंबई, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्य़ांच्या प्रत्येकी दोन प्रकल्पांचा समावेश आहे.
केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या एनसीएसटीसीमार्फत दरवर्षी हा उपक्रम देशभर राबविला जातो. प्राथमिक पातळीवर संपूर्ण भारतभरातून सुमारे आठ लाख मुले यात सहभागी होतील. माजी मुख्याध्यापक बी. बी. जाधव यांनी मुंबईतून केंद्रीय पातळीवर निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची माहिती दिली. जाधव या परिषदेकरिता राज्याचे समन्वयक म्हणून कामगिरी बजावत आहेत.
सव्‍‌र्हेक्षण, निरीक्षण आणि प्रायोगिक काम यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी माहिती मिळविणे अपेक्षित आहे. या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष मिळवितात आणि काही ठोस उपाययोजना सुचविण्याचा प्रयत्न करतात. अशा रितीने हे बाल वैज्ञानिकांनी केलेले एक लघु संशोधन असते.

’मराठा हायस्कुल, वरळी
’शेठ जी. एच. हायस्कुल, बोरीवली
निम्न स्तर गट
’शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीची मराठी माध्यम माध्यमिक शाळा, दहिसर
’मॉडर्न इंग्लिश स्कुल, चेंबूर
’ शिशु विहार माध्यमिक विद्यालय, दादर
’अ‍ॅँथनी गर्ल्स हायस्कुल, चेंबूर