News Flash

समुद्रात बुडून मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू

पॅरासिलिंग करीत असताना चालकाने गती वाढविल्याने बोटीवर सेल्फी काढत असलेल्या अझर यांचा तोल गेला.

प्रातिनिधीक छायाचित्र

बोटीवरून सेल्फी काढताना तोल गेल्याने खोल समुद्रात  बुडून मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना दांडी समुद्रात घडली. अझर मनझर अन्सारी (वय ३५ रा. मोहली व्हिलेज, साकीनाका) असे मृत्यू झालेल्या पर्यकाचे नाव आहे.

अन्सारी दाम्पत्य रविवारी दांडी येथील समुद्रकिनारी पर्यटनास गेले होते. अझर यांनी पॅरासिलिंगसाठी एका स्पीड बोटीची निवड केली. पॅरासिलिंग करीत असताना चालकाने गती वाढविल्याने बोटीवर सेल्फी काढत असलेल्या अझर यांचा तोल गेला. ते बोटीवर आपटून समुद्रात पडले. हा प्रकार लक्षात येताच तेथील पर्यटन व्यावसायिकांनी त्यांना तात्काळ बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:40 am

Web Title: mumbai traveler dies in sea abn 97
Next Stories
1 मांढरदेव यात्रेत जादूटोणा करणाऱ्यांवर कारवाईची ‘अंनिस’ची मागणी
2 पुण्यातील व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या
3 वाघांमध्ये संघर्ष वाढणार, मादींसाठी नरांमध्ये ‘टशन’!
Just Now!
X