News Flash

मतदानादिवशी आठवडा बाजार बंद

सार्वत्रिक निवडणूक २०१७ ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद/ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून दिनांक २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी तालुका कुडाळमधील गाव माणगाव, तालुका कणकवलीमधील गाव कणकवली व तळेरे येथे आठवडा बाजार असल्याने मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा व मतदान सुरळीत पार पडावे यासाठी आठवडा बाजार बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार उदय चौधरी, जिल्हा दंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तालुका कुडाळमधील गाव माणगाव, तालुका कणकवलीमधील गाव कणकवली व तळेरे येथील दिनांक २१ फेब्रुवारी २०१७ रोजी भरणारे आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. तरी याची सर्व मतदारांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच सदर दिवशी भरणारा आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास हरकत नाही.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 12:20 am

Web Title: municipal corporation elections 2017 bjp ncp mns shiv sena
Next Stories
1 सहकारी सूतगिरण्यांतील कामगारांची १५ कोटींची देणी बाकी
2 परिचारकांचे विधान भाजपच्या सडक्या मनोवृत्तीचे लक्षण- अजित पवार
3 शिवजयंती निमित्त जळगावात भव्य शोभा यात्रा
Just Now!
X