रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ व  पंधर पंच्यायत समितीच्या ११८ जांगासाठी येत्या २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.  या निवडणुकीच्या प्रचाराची मुदत आज संपली. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या.

जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३ उमेदवार निवडणुक िरगणात आहेत. तर पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ५५७ उमेदवार निवडणुक िरगणात आहेत. या सर्वच उमेदवारांनी मतदारांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न केला आहे. मोठा प्रचारसभा घेण्यापेक्षा थेट मतदारांशी संपर्क साधण्यावर त्यांनी भर दिला होता. शिवसेनेची शेवटची सभा रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद मतदारसंघात झाली. या मतदारसंघात शिवसेनेनी भाजपच्या श्रध्दा घाग यांना पाठींबा दिला आहे.

भाजपकडून आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेकडून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापकडून पक्षाचे सरचिटणीस आमदार जंयत पाटील आणि काँग्रेस कडून प्रदेश सरचिटणीस माणिक जगताप यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. काही तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेस अशी आघाडी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याची चर्चा गल्ली पासून दिल्लीपर्यंत झाली.

निवडणुकच्या िरगणात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे, आमदार पंडीत पाटील यांच्या पत्नी सुश्रूता पाटील, माजी राज्यमंत्री यांचे पुत्र आस्वाद पाटील व सून चित्रा पाटील, शिवसेना नेते महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी व कन्या जुईली दळवी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रवी पाटील यांचे पुत्र वैकुठ पाटील, शेकाप आमदार धर्यशील पाटील यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमा पाटील शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सेनेचे सल्लागार किशोर जैन, माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे चिंरजीव राजेंद्र ठाकूर हे प्रमुख उमेदवार निवडणूक िरगणात आहेत.

मंगळवारी सकाळी साडेसात वाजल्या पासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जाहिर प्रचार थांबल्याने मतदारांशी गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. मतदान प्रक्रीया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्य़ातील १९४० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी जवळपास १२ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.