अलिबाग पंचायत समिती’ निवडणूक

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुक येत्या मंगळवारी २१ फेब्रुवारीला होत आहे. अलिबाग तालुक्यात पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे . शहापूर पंचायत समिती गटातील शेकापचे सुधीर थळे हे याला अपवाद ठरले आहेत .

अलिबाग तालुका पंचायत समितीवर गेली अनेक वष्रे शेकापचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी अलिबाग मध्ये शेकाप-राष्ट्रवादी अशी आघाडी तर कॉंग्रेस-सेना-भाजप-आरपीआय अशा महायुतीने निवडणूक लढविली जात आहे. १४ जागांपकी ३ जागांवर अपक्ष उमेदवार िरगणात आहेत.

सारळ गणामध्ये शेकापचे प्रकाश पाटील, कॉंग्रेसच्या अमृता नाईक आणि भाजपचे चंद्रकांत पाटील अशी तिरंगी लढत आहे. प्रकाश पाटील आणि अमृता नाईक यांच्यात खरा सामना आहे. शहापूर पंचायत समिती गणात चौरंगी लढत आहे. शेकापचे सुधीर हिराजी थळे यापूर्वी पंचायत समिती सदस्यी राहिले आहेत . त्यांच्यासह शिवसेनेचे संदीप पाटील, भाजपाचे परशुराम म्हात्रे आणि दिपक म्हात्रे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत.

आंबेपूर गणातही चौरंगी लढत आहे. शेकापच्या रचना म्हात्रे,शिवसेनेच्या संध्या बकर यांच्यासह अपक्ष म्हणून प्रतिभा प्रविण म्हात्रे  आणि अस्मिता म्हात्रे या निवडणूक िरगणात आहेत. येथे रचना म्हात्रे विरूध्द संध्या बकर अशी लढत होईल, असे म्हटले जाते.

कुर्डुस गणातील लढतीकडे साऱ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारण या गणात शिवसेनेचे राजा केणी यांनी शेकापचे प्रमोद केशव ठाकूर यांना आव्हान दिले आहे. आवास गणात कॉंग्रेस विरूध्द शेका अशी दुरंगी लढत आहे. शेकापच्या स्न्ोहा म्हात्रे आणि कॉंग्रेसच्या सुषमा  म्हात्रे या आमने-सामने आहेत.

मापगांव मतदारसंघात कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत आहे.  या गणातून कायम कॉंग्रेसचाच उमेदवार निवडून आला आहे. सुनिल थळे, त्यांचे बंधू उमेश थळे हे पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. यावेळी उमेश थळे यांच्या पत्नी उनिता थळे या निवडणूक िरगणात आहेत. शेकापच्या समिहा पाटील यांचे त्यांना आव्हान आहे.

थळमध्ये कॉंग्रेस विरूध्द सेना अशी लढत होत आहे. येथे भाजपाचे शैलेश नाईक हेदेखील निवडणूक लढवित आहेत. तालुक्यात कॉंग्रेस-सेना युतीने लढत असल्याने येथील कॉंग्रेसचे संतोष म्हात्रे आणि सेनेचे गजानन बुंदके हे आमने-सामने आहेत. तर वरसोली गणातही कॉंग्रेस विरूध्द सेना असे चित्र आहे. कॉंग्रेसचे सुजय घरत आणि शिवसेनेचे उमेश नाना वर्तक यांच्यात लढत होणार आहे. थळमधील पंचायत समितीच्या िदोन्हीे जागांवरील आपले उमेदवार शेकापने मागे घेतले आहेत .

चेंढरे पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी ही प्रथमच निवडणुकीला सामोरी जात आहे. शेकापच्या स्वाती  पाटील यांचे त्यांना आव्हान आहे. तर खंडाळे पंचायत समिती गणातही सरळ लढत होत असून शेकापच्या मिनल माळी विरूध्द शिवसेनेच्या पूजा महेश गुरव असा सामना होणार आहे.  मीनल माळी हिने मागील वेळी चेंढरेतून जिल्हाअ परीषदेची निवडणूक लढवली होती .

रेवदंडा पंचायत समितीमध्ये शेकापचे नितीन म्हात्रे आणि भाजपाचे उदय अशोक काठे हे एकमेकांविरोधात आहेत. तर चौल गणात शेकापच्या प्रतिक्षा खडपे आणि कॉंग्रेसच्या मयुरी पाटील यांच्यात लढत होत आहे. बेलोशी मध्ये दुरंगी लढत असून शेकापच्या गौरी हरिश्चंद्र सोनार यांना कॉंग्रेसच्या ताई गडकर यांचे आव्हान आहे. तर रामराज मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. येथे शेकापच्या प्रिया नथुराम पेढवी, शिवसेनेचे राजू जाधव आणि भारिप बहुजन महासंघाचे रामा लेंडी हे निवडणूक लढवित आहेत.

अलिबाग पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जातीसाठी आरक्षित आहेत . त्योमुळे बेलोशी व रामराजमधील लढतींकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.