सांगली : र्निबधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी दहा दुकानावर महापालिकेने कारवाई करीत ६६ हजाराचा दंड वसूल केला.

अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी अकरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली असतानाही काही दुकाने निर्धारित वेळेनंतरही सुरू राहत असल्याची माहिती मिळाल्याने उपायुक्त राहूल रोकडे यांनी विश्रामबाग व  बाजार समितीच्या आवारात आज पाहणी केली असता सात दुकाने सुरू असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर ४५ हजार रुपये दंड आकारणी करण्यात आली. तसेच गर्दीला कारणीभूत ठरल्याबद्दल  बाजार समितीला नोटीस बजावण्यात आली आहे.  तसेच सांगली शहरात टाळेबंदीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३ आस्थापणांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून २१ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तर विनामुखपट्टीचा वावर करीत असलेल्या. आठ नागरिकांवर प्रत्येकी पाचशे रुपये असा चार हजाराचा दंड ठोठावण्यात आला.