अलिबाग नगर परिषदेच्या १७ जागांपकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. शनिवार नगरपालिकेच्या सभागृहात प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. अलिबागचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. नेहा जाधव या मुलीने आरक्षणाच्या चिठ्ठय़ा उचलल्या. अलिबाग नगर परिषदेत ८ प्रभाग असून त्यात १७ वार्ड आहेत. त्याचे आज आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग १मध्ये १ - अ अनुसूचित जमाती महिला, १- ब. सर्वसाधारण. प्रभाग २ मध्ये २- अ ना.म. प्रवर्ग महिला, २- ब सर्वसाधारण, प्रभाग तीनमध्ये ३ - अ. जागेत ना. म.प्र. सर्वसाधारण, ३-ब. सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ मध्ये ४- अ ना. म. प्र. सर्वसाधारण, ४ - ब. सर्वसाधारण महिला, प्रभाग ५मध्ये ५- अ. ना.म.प्र. सर्वसाधारण, ५- ब. सर्वसाधारण महिला, प्रभाग ५मध्ये ५- अ. अनुसूचित जाती सर्वसाधारण, ५- ब. जागेत सर्वसाधारण महिला, प्रभाग ६मध्ये ६- अ. ना. म. प्र. महिला, ६- ब. सर्वसाधारण, प्रभाग ७ मध्ये ७- अ. सर्वसाधारण महिला, ७- ब सर्वसाधारण, प्रभाग ८मध्ये ८- अ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, ८- ब ना.म.प्र. महिला, ८- क जागेत सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. आरक्षण सोडतीच्या वेळी अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.