श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी स्कायवॉक बांधण्याचे काम सुरु केले. मात्र या भागातील नागरिकांना विश्वासात न घेता आणि नगरपालिकेने परवानगी नाकारल्यामुळे या ‘स्कायवॉक’च्या बांधकामाला बंद करण्याची नोटीस मंदिर समितीला नगरपालिकेने दिली आहे.त्यामुळे नगरपालिका आणि मंदिर समितीच्या वादात स्कायवॉकचे बांधकाम रखडले आहे.
आषाढी,काíतकी सारख्या मोठय़ा यात्रा काळात लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन मंडपातून विणे गल्ली, तेथून पुढे सारडा भवन समोरून ते स्मशानभूमी माग्रे गोपाळपूरकडे ही रांग जाते. या दर्शन रांगेतील मार्गावर अनेक नागरिक राहतात. त्यामुळे येथील नागरिकांना यात्रा कालवधीत अनेक त्रास सहन करावा लागतो.त्याच बरोबर येथून काही भाविक दर्शन रांगेत घुसून अनेकवेळा गोंधळही झाला आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन मंदिर समितीने स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला.या बांधकामासाठी मंदिर समितीने नगरपालिकेला अर्ज दिला आहे.
ज्या भागातून स्कायवॉक उभारला जाणार आहे, तो मार्ग अरुंद आहे. जर याचे बांधकाम झाले तर साधी घंटागाडी,अ‍ॅम्ब्युलन्स,आणि ये-जा करण्यास अडचण निर्माण होऊ शकते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तर, मंदिर समिती बांधत असलेल्या स्कायवॉकचा आराखडा नागरिकांना दाखवावा. येथील नागरिकांशी या बाबत मंदिर समितीने चर्चा करावी. स्कायवॉक बांधण्याला विरोध नाही, परंतु येथील नागरिकांची गरसोय होणार नाही याची दक्षता मंदिर समितीने घ्यावी, अशी मागणी नगरपालिकेच्या बांधकाम समिती सभापती सविता सत्यविजय मोहोळकर यांनी केली आहे. या बाबत येथील नागरिकांनी पालिकेकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे या स्कायवॉकचे बांधकाम थांबवावे असे पत्र मंदिर समितीला दिल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.

Departure of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony on 29th June
पुणे : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून