News Flash

एकतर्फी प्रेमातून नागपूरमध्ये प्राध्यापकाची हत्या

एकतर्फी प्रेमातून मुलीच्या वडिलांचा गोळ्या घालून खून केल्याची घटना बुधवारी नागपूरमध्ये घडली. या घटनेत प्रा. योगेश डाखोडे मृत्युमुखी पडले.

| April 3, 2013 01:00 am

एकतर्फी प्रेमातून मुलीच्या वडिलांचा गोळ्या घालून खून केल्याची घटना बुधवारी नागपूरमध्ये घडली. या घटनेत प्रा. योगेश डाखोडे मृत्युमुखी पडले. गोळीबार करणाऱया व्यक्तीचे नाव अन्वर खान असून, त्याचे डाखोडे यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने केलेल्या मारहाणीत डाखोडे यांची पत्नीही जखमी झाली आहे. पोलिसांनी अन्वरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास डाखोडे यांच्या घरात घुसला. त्याने सुरुवातीला प्रा. डाखोडे यांच्यावर स्वतःकडील देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने चाकू आणि रॉडच्या साह्याने डाखोडे यांच्या पत्नीवर हल्ला केला. त्याने त्यांच्यावरही गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडील देशी कट्ट्यातून गोळी बाहेर पडली नाही. त्यानंतर अन्वरने प्रा. डाखोडे यांच्यावरही चाकूने हल्ला केला. हा प्रकार लक्षात आल्यावर  डाखोडे यांच्या शेजाऱयांनी पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्यामुळे अन्वरला पकडण्यात त्यांना यश आले. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू आणि रॉड जप्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:00 am

Web Title: murder of a professor in nagpur due to one sided love
Next Stories
1 एलबीटीविरोधातील याचिका नागपूर हायकोर्टाने फेटाळल्या
2 लक्ष्मण माने यांचा जामीन अर्ज फेटाळला
3 भाजपच्या अजेंडय़ावर पुन्हा समान नागरी कायदा
Just Now!
X