14 August 2020

News Flash

लॉकडाउन काळात कागलमध्ये भर दुपारी रस्त्यावर तरूणाचा खून

वार झाल्यानंतर उपचारांसाठी नेत असतानाच तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : भरदुपारी रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून कागल येथे एका तरूणाचा खून करण्यात आला. आकाश विनायक सोनुले उर्फ मॅनर्स (वय २८, रा. मातंग वसाहत, कागल) असे मयत तरुणाचे नाव आहे. खून केल्यानंतर हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले. तो गटार बांधकाम ठेकेदार होता.

महात्मा फुले वसाहतीजवळ लक्ष्मी मंदीरासमोर दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. लॉकडाउनमुळे कागल शहरातील रस्ते निमर्नुष्य आहेत. शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. अशा परिस्थितीत येथील महात्मा फुले वसाहतीजवळील लक्ष्मी मंदीर समोरून आपल्या घराकडे आकाश जात होता. यावेळी तेथे दबा धरून राहिलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्याला थांबवुन डोळ्यत मिरचीपूड फेकली. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप डोक्यात, मानेवर व पोटात १६ वार करण्यात आले. या हल्ल्यात आकाश किंचाळत जागेवर कोसळला. तो निचपित पडल्यावर दोन हल्लेखोर मोटरसायकलवरून सांगाव नाक्याच्या दिशेने पसार झाले. जमलेल्या तरुणांनी आकाशला उपचारासाठी नेले, मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, करवीरचे उपविभागीय अधिकारी डॉ.प्रशांत अमृतकर, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच फ्लॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन मिळालेल्या शस्त्राची पाहणी केली. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 8:51 pm

Web Title: murder of a youth on the streets in the afternoon in kagal during the lockdown scj 81
Next Stories
1 धनंजय महाडिक यांनी घेतली सुप्रिया सुळे यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण
2 कोल्हापुरात बेड अभावी करोना रुग्णाच्या दुर्दैवी मृत्यूचे गंभीर पडसाद, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
3 आसोलामेंढा धरणावरील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्या : विजय वडेट्टीवार
Just Now!
X