News Flash

शेतीच्या वादातून भाऊ, जावयाचा खून

कुऱ्हाड, तलवार व लोखंडी रॉडने गोविंद जगताप यांना जबर मारहाण केली.

(संग्रहित छायाचित्र)

लातूर : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची आणि जावयाची हत्या करण्यात आल्याची घटना उदगीर तालुक्यातील हेर येथे घडली आहे. या घटनेत गोविंद जगताप व नितीन पावडे यांची हत्या झाली.

गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास बालाजी जगताप व गोविंद जगताप या सख्ख्या भावांमध्ये शेतीच्या वादातून हाणामारी झाली. यानंतर संशयित आरोपी बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप, पूजा जगताप, अश्विनी जगताप, सोजरबाई ठगे, फुलाबाई जगताप यांनी माजी पोलीस पाटील पंडित पाटील यांच्या सांगण्यावरून मारहाणीचा कट रचला. कुऱ्हाड, तलवार व लोखंडी रॉडने गोविंद जगताप यांना जबर मारहाण केली. त्यांना दुचाकीवरून घेऊन जाणारे त्यांचे जावई नितीन पावडे व भाऊ भगवान जगताप यांनाही मारहाण केली. यात नितीन पावडे हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी गोविंद जगताप यास मृत घोषित केले, तर गंभीर असलेल्या नितीन पावडेला लातूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. डॉक्टरांनी नितीन पावडे यास मृत घोषित केले. मृताची पुतणी जनाबाई बिरादार यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 12:16 am

Web Title: murder of brother son in law over agricultural dispute zws 70
Next Stories
1 फिरत्या पशुचिकित्सालयाचा सर्वाधिक लाभ पुणे जिल्हा विभागाला
2 चंद्रपूर – ३० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून तरूण अभियंत्याला जिवंत जाळलं
3 Coronavirus – राज्यात मागील २४ तासांत ३ हजार ६११ करोनाबाधितांची वाढ, ३८ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X