मालेगावमध्ये एका दाम्पत्याने आपल्या चार मुलांची हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुरेश साहू असे या घटनेतील पित्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, साहू यांनी आपल्या पत्नीच्या साह्याने चार मुलांची गळा दाबून आत्महत्या केली. त्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली. या घटनेमागील कारण अस्पष्ट आहे. पोलिस घटनास्थळी तपास करीत असून, अद्याप हत्या आणि आत्महत्येचा उलगडा झालेला नाही.
(संग्रहित छायाचित्र)