25 February 2021

News Flash

पतीच्या हत्येप्रकरणी महिलेला जन्मठेप

पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी या गुन्ह्यचा अधिक तपास केला.

प्रतिनिधिक छायाचित्र

वाडा : दारू पिण्यासाठी पैसे मागणाऱ्या तसेच छोटय़ा-मोठय़ा कारणावरून मुलीला मारहाण करणाऱ्या पतीवर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारणाऱ्या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चंद्रकला चंद्रकांत भोईर ( ३५) असे  महिलेचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.

चंद्रकांत भोईर हे पत्नी चंद्रकलाकडे नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागत असल्याने तसेच क्षुल्लक कारणांवरून मुलीला मारहाण करत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद होत होते. १७ सप्टेंबर २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास याच कारणावरून पुन्हा वाद झाल्याने संतापलेल्या चंद्रकला हिने पती चंद्रकांत भोईर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी चंद्रकला हिच्याविरोधात वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी या गुन्ह्यचा अधिक तपास केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 4:05 am

Web Title: murder of husband life convict women akp 94
Next Stories
1 निष्क्रिय लोकांबरोबर राहिलो तर भविष्यात लोकच माझ्यासोबत राहणार नाहीत
2 आदिवासींना आता तातडीने जातवैधता
3 तारापूरमधील वस्त्रोद्योगांतील उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट
Just Now!
X