News Flash

अपहरण करून बालकाचा खून

सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासातून बालकाचे अपहरण करून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी येथे उघडकीस आली. आर्यन शिरीष सासणे असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

| August 19, 2013 12:22 pm

सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासातून बालकाचे अपहरण करून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी येथे उघडकीस आली. आर्यन शिरीष सासणे असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे, पावणेदोन वर्षांचा आर्यन हा नाना पाटील नगरातील घरी खेळत असताना त्याची आई घरकामात व्यस्त होती. त्यावेळी कुणीतरी त्याला पळवून नेले. तो हरवल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात वडिलांनी दिली. त्यानंतर सायंकाळी पुइवाडी येथे निर्जन भागात एका बालकाचे प्रेत असल्याचे गुराख्यांना दिसून आले, त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर वर्णनावरून तो मृतदेह आर्यन याचाच असल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्यनच्या गळ्यातील सोन साखळी व कानातील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले होते. त्याचे वडील शिरीष सासणे यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 12:22 pm

Web Title: murder of kidnap child
टॅग : Child
Next Stories
1 ‘मेटे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही’
2 निवडणुकीसाठी काँग्रेसची मुंबईत बुधवारी बैठक
3 जिल्ह्य़ातील तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी देऊ- भुजबळ
Just Now!
X