28 September 2020

News Flash

वर्धा : खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

कारागृहात तो गेल्या काही दिवसांपासून बैचेन होता

संग्रहित छायाचित्र

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने कारागृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील गोपीचंद रामचंद्र डहाके (वय ३८) असे मृत कैद्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या केल्याचे आज पहाटे निदर्शनास आले. शिक्षा झाल्यानंतर त्याला अमरावतीच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला वर्धेच्या मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते.

काही महिन्यांपूर्वी त्याला पॅरोलवर सोडण्यात आले होते. पण दिलेल्या मुदतीत तो परत न आल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. तो आपल्या गावी आल्याची माहिती मिळाल्यावर यवतमाळ पोलिसांनी त्याला अटक करीत वर्धेच्या कारागृहात त्याची रावानगी केली होती. मात्र, पुन्हा कारागृहात आल्यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून बैचेन होता. याच अवस्थेत त्याने मध्यरात्री बरॅकमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

या कैद्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 3:37 pm

Web Title: murder prisoner commits suicide by hanging in jail aau 85
Next Stories
1 कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर आणखीन एक विघ्न; दरड कोसळल्याने रेल्वे गाड्या मिरजमार्गे वळवल्या
2 खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण
3 फडणवीस सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द
Just Now!
X