News Flash

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाने मृत तरुणाचा परस्पर उरकला अंत्यविधी

मनमानी केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

प्रतिनिधिक छायाचित्र

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने मनमानी करत एका तरुणाचा अंत्यविधी परस्पर उरकल्याची तक्रार मृत तरुणाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तुळजापूर शहरातील रितेश आविनाश राऊत (वय १६) याला दम्याचा त्रास असल्याने त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. चंचला बोडके यांनी त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर आपल्याला कळवून मृतदेह स्वाधीन केला जाईल, असे सांगितले.

मात्र, त्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर नगर परिषद व तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाने अंत्यसंस्कार उरकल्याचा आरोप मृत तरुणाचे चुलते अनिरुद्ध राऊत यांनी केला आहे. तहसीलदारांमार्फत त्यांनी जिल्हाधिकाऱ्याना तसे निवेदनही दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 9:25 pm

Web Title: mutual funeral by tuljapur sub district hospital without permission of relatives aau 85
Next Stories
1 राज्यातील करोना बाधितांच्या संख्येचा आलेख वाढताच; दिवसभरात आठ हजार रुग्णांची भर
2 सीबीएसई दहावीच्या निकालात अकोल्याचे विद्यार्थी चमकले
3 अकोल्यात करोना मृत्यूंची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर
Just Now!
X