04 July 2020

News Flash

केश कर्तनालय दुकानदारांचे ‘माझे दुकान, माझी मागणी’ आंदोलन 

दुकान सुरू करण्यास परवानगी देताना संरक्षणासाठी प्रशिक्षण द्यावे

संग्रहित छायाचित्र

 

टाळेबंदीमुळे २३ मार्चपासून बंद असलेल्या केश कर्तनालय दुकानदारांनी शनिवारी ‘माझे दुकान माझी मागणी’ असे आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले.

टाळेबंदीमुळे अडीच महिन्यापासून केशकर्तनाची दुकाने बंद असल्याने व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजावर संकट ओढवले आहे. या काळात दुकानभाडे, वीजबिल, थकले असून कुटूंब चालविण्यासाठीसुध्दा पैसे उरलेले नाही. दुकानाचे भाडे थकल्याने घरमालकाकडून घर खाली करण्याचे ताकीद मिळाली आहे. वर्धेत अनेकांना दुकाने बंद करून घरी बसण्याची वेळ आली. अक्षरश: उपासमार सहन करणाऱ्या या व्यावसायिकांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. पाचव्या टप्यातील टाळेबंदीत सलून वगळता इतर सर्व दुकानांना सुरू करण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र नाभिक समाजाने याकडे लक्ष वेधण्यासाठी दुकानापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे सलून असोसिएशनचे अध्यक्ष लिलाधर येउलकर यांनी सांगितले. शासनाने आमच्या मागण्याकडे दुलक्र्ष करू नये. या व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे, वीजबिल माफ  करावे, दुकानदारांना दहा हजार रुपये तर कारागिरांना सात हजार रुपये प्रती महिना अनुदान द्यावे. दुकान सुरू करण्यास परवानगी देताना संरक्षणासाठी प्रशिक्षण द्यावे. तसेच मोफत पीपीई संच द्यावे, अशा मागण्या आंदोलनावेळी करण्यात आल्या. याकडे त्वरित लक्ष न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन केल्या जाईल, असा ईशारा संघटनेने दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2020 12:42 am

Web Title: my shop my demand movement of hairdressers abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 बछडय़ाची वाघिणीशी भेट घालून देण्यासाठी वनविभागाची धडपड
2 धुळ्यात २४ तासांत करोनाचे २३ नवीन रुग्ण
3 रायगड जिल्ह्यात करोनाचे ८२ नवे रुग्ण
Just Now!
X