स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात भाजपला मराठवाड्यात बसलेल्या फटक्याची कसर दुसऱ्या टप्प्यात काहीप्रमाणात भरून निघाली आहे. लातूर जिल्हय़ातील औसा, निलंगा, अहमदपूर व उदगीर नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये निलंगा निलंगा नगरपालिकेत भाजपने काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करून पालिकेवर झेंडा फडकवला आहे. तर उदगीरमध्येही भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. निलंगा पालिकेत भाजपने १४ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, भाजपचे बाळासाहेब शिंगडे हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात भाजपला मराठवाडय़ात अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे लातूर जिल्ह्य़ात होणाऱ्या चार नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप व पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांची कसोटी लागली होती. निलंगा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवून निलंगेकर यांनी या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय, उदगीर , औसा आणि अहमदपूर नगरपालिकांमध्येही भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. उदगीरमध्ये आतापर्यंत एकूण ३८ जागांपैकी २० जागांचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजप व काँग्रेसला प्रत्येकी ७, एमआयएमला ६ जागांवर विजय मिळाला आहे. औसा नगरपालिकेत २० पैकी १४ जागा जिंकत राष्ट्रवादीने काँग्रेसने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादीचे अफसर शेख विजयी झाले आहेत. तर अहमदपूर नगरपालिकेतील एकूण २३ जागांपैकी ९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. याठिकाणी बहुजन विकास आघाडीने ४ जागा जिंकल्या असून नगराध्यक्षपदीही त्यांच्याच अश्विनी कासनाले निवडून आल्या आहेत. याठिकाणी भाजपला सहा, शिवसेना २ आणि काँग्रेस २ जागांवर विजयी झाली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम, बहुजन विकास आघाडी आदींसह अपक्ष उमेदवारांमध्ये येथे चुरशीची लढत होत होती. लातूरमधील चारही पालिकांच्या निवडणुका जिंकण्याकरिता पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी मेहनत घेतली होती. पहिल्या टप्प्यात मराठवाडय़ात मर्यादित यश मिळाल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला होता. चारपैकी सध्या प्रत्येकी दोन पालिकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे येथील मतदार कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

chandrapur gadchiroli marathi news, bjp congress candidates marathi news
चंद्रपूर : निवडणुकीतील उमेदवारांची विकासकामे दाखवा अन् बक्षिस मिळवा! समाज माध्यमांवर पोस्ट सार्वत्रिक; भाजप – काँग्रेसमध्ये जुंपली
During the Lok Sabha elections under all the six major parties in the Maharashtra state
सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाट्य, अनेक मतदारसंघांत बंडखोरी
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…
Wide gap between young women and man in electoral rolls in Jalana
जालन्यातील मतदारयाद्यांमध्ये तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत

दरम्यान, पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. तब्बल ३१ नगरपालिका जिंकून भाजपने आघाडी घेतली आहे. तर ५२ ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. भाजपपाठोपाठ २० नगरपालिका जिंकत काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. काँग्रेसचेही २२ ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले. तर राष्ट्रवादी १७ नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना १६ नगरपालिकांसह शेवटच्या क्रमांकावर आहे. त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल ३४ आहे.

Live Updates
14:50 (IST) 15 Dec 2016
उदगीर नगरपालिका नगराध्यक्षपदी भाजपचे बस्वराज बागबंदे २१७८ मतांनी विजयी. एमआयएमचे उमेदवार ताहेर शेख दुसऱ्या क्रमांकावर
14:13 (IST) 15 Dec 2016
उदगीर नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराला मागे टाकत भाजपचा उमेदवार आघाडीवर
14:02 (IST) 15 Dec 2016
उदगीर पालिकेत भाजपा,काँग्रेस प्रत्येकी १३, एमआयएम ६ जागांवर विजयी
14:01 (IST) 15 Dec 2016
निलंगा पालिकेत भाजपा १७,काँग्रेस.२,राष्ट्रवादी१,नगराध्यक्षपदी भाजपाचे श्रीकांत शिंगाडे विजयी
11:56 (IST) 15 Dec 2016
अहमदपूर नगरपालिकेत त्रिशंकू स्थिती
11:53 (IST) 15 Dec 2016
अहमदपूरच्या नगराध्यक्षपद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनाळे विजयी
11:41 (IST) 15 Dec 2016
उद्गीर नगरपालिकेत काँग्रेसचे ५ उमेदवार विजयी
11:33 (IST) 15 Dec 2016
निलंगा नगरपालिका – एकूण जागा २०, भाजप ५, काँग्रेस एका जागेवर विजयी
11:31 (IST) 15 Dec 2016
अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीचे शाहनवाज बागवान आघाडीवर
11:30 (IST) 15 Dec 2016
निलंगा नगरपालिकेच्या २० जागांपैकी भाजप ३ आणि काँग्रेस एका जागेवर विजयी
11:22 (IST) 15 Dec 2016
उद्गीर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमचे ताहिर हुसेन आघाडीवर
11:04 (IST) 15 Dec 2016
लातूरमध्ये पालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात
08:02 (IST) 15 Dec 2016
चारही पालिकांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय
08:02 (IST) 15 Dec 2016
एमआयएमने मुस्लीमबहुल भागात चांगली कामगिरी केल्यास त्याचा काँग्रेसला फटका बसू शकतो.
08:02 (IST) 15 Dec 2016
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम, बहुजन विकास आघाडी आदींसह अपक्ष उमेदवारांमध्ये येथे चुरस
08:01 (IST) 15 Dec 2016
५० प्रभागांतील १०१ उमेदवार आणि ४ नगराध्यक्षांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
08:00 (IST) 15 Dec 2016
भाजपचे स्थान सर्वच पालिकांमध्ये नगण्य; मराठवाड्यातील आगामी वाटचालीच्यादृष्टीने आजच्या निकालांकडे लक्ष
08:00 (IST) 15 Dec 2016
निलंगा व उदगीर या पालिकेत काँग्रेस तर अहमदपूर व औशात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता
08:00 (IST) 15 Dec 2016
लातूर जिल्ह्य़ातील चारही नगरपालिकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा
08:00 (IST) 15 Dec 2016
पालिकांमधील सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न
07:54 (IST) 15 Dec 2016
सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात