कोल्हापूर जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निकालाने अनेक प्रस्थापितांना धक्का बसला. तर भाजपला जनसुराज्य पक्षाच्या आधाराने पहिल्यांदाच ग्रामीण भागात शिरकाव करण्याची संधी मिळाली. गडहिंग्लज, मुरगुड येथे आमदार हसन मुश्रीफ यांना तर कागल व मलकापूर येथे शिवसेनेचे आमदार सत्यजित घाटगे यांना धक्का बसला. जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्याशी युती करून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपला पन्हाळा आणि मलकापूर नगरपालिकेत विजय मिळवून दिला. पेठवडगाव येथे आमदार सतेज पाटलांना धक्का बसला पण कुरूंदवाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी मात्र त्यांनी विजयाची मोहोर उमटवली. कागल नगरपालिकेवर आमदार हसन मुश्रीफ यांनी वर्चस्व मिळवत चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे गडहिंग्लज नगरपालिकेवर जनता दलाने झेंडा फडकवला आहे. जयसिंगपूर नगरपालिकेत शाहु आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्ष मात्र ताराराणी आघाडीच्या नीता माने या निवडून आल्या आहेत.
निकाल पुढीलप्रमाणे:
पन्हाळा नगरपालिका: नगराध्यक्ष- रुपाली धडेल (जनसुराज्य पक्ष), बलाबल: एकूण १७ पैकी जनसुराज्य पक्ष १२, शाहू विकास आघाडी ३, पन्हाळा विकास आघाडी २, धक्का कुणाला: स्थानिक आघाडीला धक्का
गडहिंग्लज नगरपालिका: नगराध्यक्ष- स्वाती कोरी (जनता दल), बलाबल: एकूण १७ पैकी जनता दल १०, राष्ट्रवादी काँग्रेस ४, भाजप ३, धक्का कुणाला: आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर
मुरगुड नगरपालिका: नगराध्यक्ष- राजेखान जमादार, बलाबल: एकूण १७ पैकी शिवसेना १२, राष्ट्रवादी काँग्रेस २, पाटील गट १, अपक्ष २, नेते- शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक, धक्का कुणाला: आमदार हसन मुश्रीफ
पेठवडगाव नगरपालिका: नगराध्यक्ष- मोहनलाल माळी, युवक क्रांती आघाडी (सर्वपक्षीय), बलाबल: एकूण जागा १७ पैकी युवक क्रांती महाआघाडी १३ जागा (माजी आमदार जयवंतराव आवळे आणि महादेवराव महाडीक गट), यादव आघाडी ४ जागा (काँग्रेस, आमदार सतेज पाटील गट), नेते: माजी आमदार जयवंत आवळे आणि महादेव महाडीक, कुणाला धक्का- आमदार सतेज पाटील

मलकापूर नगरपालिका: नगराध्यक्ष- अमोल केसरकर, भाजप, पक्षीय बलाबल १७ पैकी भाजप- जनसुराज्य आघाडी ९, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस ८, नेते: विनय कोरे आणि चंद्रकांत पाटील, धक्का कुणाला: शिवसेना आमदार सत्यजित पाटील
कुरुंदवाड नगरपालिका: नगराध्यक्ष- जयराम पाटील, काँग्रेस, पक्षीय बलाबल: १७ पैकी काँग्रेस ५, राष्ट्रवादी काँग्रेस ६, भाजप ६, नेते: काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा नगराध्यक्ष, धक्का कुणाला: राष्ट्रवादी काँग्रेसला
कागल नगरपालिका: नगराध्यक्ष– माणिक रमेश माळी, राष्ट्रवादी, पक्षीय बलाबल: २० जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ११, भाजप ०९, नेते: आमदार हसन मुश्रीफ, कुणाला धक्का: चंद्रकांत पाटील आणि समरजितसिंह घाटगेंना धक्का
जयसिंगपूर नगरपालिका: नगराध्यक्ष- नीता माने (ताराराणी आघाडी), पक्षीय बलाबल: २४ जागांपैकी शाहू विकास आघाडी १३ (राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष), ताराराणी आघाडी ९, अपक्ष २

Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे
Liquor stock worth 28 lakh seized Gadchiroli action befor elections
गडचिरोली : २८ लाखांचा मद्यसाठा जप्त; निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई