News Flash

नागपूर : बिहाडा खाणीत पडून वाघाचा मृत्यू

खडकाळ भागावरुन घसरुन वाघ खाणीत पडला असावा आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा

५५ फूट खोल आणि २५ फुट पाणी असलेल्या खाणीत पडून वाघाच्या मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना मृतावस्थेतील वाघ बिहाडा खाणीतील पाण्यावर तरंगत असल्याचे दिसताच खळबळ उडाली.
नागपूर वनविभागाच्या रामटेक वनपरिक्षेत्राअंतर्गत मानेगाव बिट संरक्षित वनकक्ष क्र. २९३ च्या परिसरात बिहाडा खाणीत वाघाचा मृतदेह तरंगतांना वनखात्याच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिसून आले.

घटनेची माहिती वरिष्ठांना देताच रामटेक उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी व त्यांची चमू तसेच मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते घटनास्थळी पोहोचले. खडकाळ भागात ही खाण असून ती ५५ फुट खोल आहे. तर २५ फूटपर्यंत या खाणीत पाणी भरलेले होते. त्यामुळे खडकाळ भागावरुन घसरुन वाघ खाणीत पडला असावा आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा खाणीतून वाघाचे शव काढण्यात आले. रविवारी सकाळी शवविच्छेदन आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी कळवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 9:26 pm

Web Title: nagpur bihad mine tige dead nck 90
Next Stories
1 चंद्रपुरात लोखंडी हातोड्याने वार करून वडिलांकडून मुलाची हत्या
2 अजित पवारांना निर्दोषत्व देण्याचा निर्णय भाजप सरकारचा!
3 भावनांच्या कल्लोळाचे हृदयस्पर्शी सादरीकरण!
Just Now!
X