News Flash

त्या नराधमांना कठोर शिक्षा कराच – बलात्कार पिडीतेची आर्त हाक

लघुशंकेसाठी झुडुपात गेली असताना चार ट्रक चालकांनी मिळून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्यांनी तिच्या चेहऱ्यावर दगडाने मारण्यास सुरुवात केली.

त्या नराधमांना कठोर शिक्षा कराच – बलात्कार पिडीतेची आर्त हाक
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूरमध्ये १४ ऑगस्ट रोजी एका तरुणीवर अमानुषपणे सामूहीक बलात्कार करण्यात आला होता. या तरुणीला झुडपात नेऊन बलात्कार करणाऱ्या नराधमांनी आपला प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तिला दगडाने मारुन गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर बेशुद्धावस्थेत असलेली ही तरुणी आज शुद्धीवर आली असून तिने काही वाक्य बोलली आहेत. मला खूप मारलं, त्यामुळे मला त्रास झाला त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी विनंती तिने पोलिसांना केली आहे. उमरेड तालुक्यातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या गोकुळ कोळसा खाणीत ही घटना घडली होती.

ही तरुणी लघुशंकेसाठी झुडुपात गेली असताना चार ट्रक चालकांनी मिळून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्यांनी तिच्या चेहऱ्यावर दगडाने मारण्यास सुरुवात केली. यामध्ये ही तरुणी गंभीर जखमी झाली. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला आणखी त्रास देण्यास सुरुवात केली. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या तरुणीला अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे.

तिची प्रकृती अतिशय नाजूक झाली असून ती शुद्धीत आली असली तरीही तिच्या चेहऱ्याची त्वचा अद्यापही पूर्णपणे जोडली गेलेली नाही. तसेच तिच्या जबड्याचीही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शारीरिकदृष्ट्या ती कदाचित बरी होईलही मात्र तिला बसलेल्या मानसिक धक्क्याचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या घटनेचा धसका घेतलेली ही तरुणी सतत आपल्या आईला बिलगून बसत असल्याचेही सांगण्यात आले. आपल्याला यातील एक आरोपी स्पष्टपणे आठवत असल्याचे या तरुणीने सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरु आहे. याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून या घटनेचा तपास लावण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयात जाऊन तरुणीच्या प्रकृतीची चौकशी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 8:45 pm

Web Title: nagpur gang rape issue victim girl demand to give strict punishment to accuse
Next Stories
1 टीव्ही, फास्ट फूडमुळे वेगाने वाढतोय लठ्ठपणा
2 सत्काराआडून पटोलेंच्या दावेदारीला बळ!
3 बंदी असतानाही श्रींच्या सजावटीत थर्माकोलचा वापर
Just Now!
X