मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा आणि मुंबई-नागपूरदरम्यानचा रस्ते प्रवास केवळ सात तासांवर आणणाऱ्या बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम सध्या वेगाने सुरु आहे. देशातील सर्वात मोठा महामार्ग असणारा हा प्रकल्प २०२१ च्या अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नेमका हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग कसा असणार आहे? यामुळे काय फायदे होणार आहेत ? यासंबंधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर मोकळेपणाने उत्तरं दिली.

या मुलाखतीत राधेश्याम मोपलवार यांनी शेतकऱ्यांचा होणारा विरोध, जमीन अधीग्रहण, महामार्गाशेजारील गावांचा विकास, प्रकल्पावरील वित्तीय भार अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.