28 February 2021

News Flash

नागपूरमध्ये अपमानाचा बदला घेण्यासाठी लेखापालाची हत्या, सहकाऱ्याला अटक

दुसऱ्या समाजातील असल्याने अशी अपमानास्पद वागणूक मिळते, असा नथवानीचा समज झाला

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूरमधील सुरेश एक्स्पोर्ट या कंपनीतील लेखापाल राजू नारंग यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. कंपनीतील एका कर्मचाऱ्यानेच राजू नारंग यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू उर्फ देविदास नथवानी (४८) आणि दिवेश ठक्कर (२६), विनायकराव लोणे (४४) आणि करणसिंग उर्फ बहादुरसिंग जायगडी (४६) यांना अटक केली आहे. याप्रकरणात आणखी एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली.

प्रकाश वाधवानी यांच्या सुरेश एक्स्पोर्ट या कंपनीत राजू नारंग हे लेखापाल म्हणून काम करायचे. वाधवानी यांचे मावस भाऊ असल्याने नारंग यांना कंपनीत मालकानंतरचे दुसरे स्थान होते. तर नथवानी हा देखील कंपनीत लेखापालच होता. कंपनीतील सर्व कर्मचारी हे सिंधी होते. तर नथवानी गुजराती होते. नारंग यांचे नेहमीच नथवानीशी खटके उडायचे. दुसऱ्या समाजातील असल्याने अशी अपमानास्पद वागणूक मिळते, असा नथवानीचा समज झाला होता. नथवानीचा फरसणाच व्यवसाय देखील होता.

२७ डिसेंबरला नारंग हे कळमना येथील शीतगृहाची पाहणी करुन कार्यालयात परतत होते. यादरम्यान, नथवानीने नारंग यांना फोन केला आणि फरसाण व्यवसायाबाबत चर्चा करायची आहे असे सांगत त्यांना डिप्टी सिग्नल परिसरातील गोदामात बोलावले. तिथे नथवानी आणि नारंग यांच्यात वाद झाला. यानंतर नथवानीने नारंग यांचे डोके भिंतीवर आपटले. यात नारंग यांचा मृत्यू झाला. नथवानीने नारंग यांचा मृतदेह तिथेच सोडला आणि कार्यालयात परतला. दुसऱ्या दिवशी दिवेशच्या गाडीने नथवानी पुन्हा गोदामात गेला. दिवेश व अन्य आरोपींच्या मदतीने नथवानीने नारंग यांचा मृतदेह पोत्यात टाकून कन्हान नदीत फेकला.

नारंग यांच्या मोबाईलवर शेवटचा फोन नथवानीचा होता, हे पोलीस तपासात समोर आले होते. चौकशीत नथवानीचा फरसाणचा व्यवसाय असून त्याच्या गोदामाविषयी माहिती उघड झाली. या गोदामात छोट्या मालवाहू वाहनाचा वापर होतो. हे वाहन मौदा मार्गाने गेले होते का यासाठी पोलिसांनी मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ठोस माहिती मिळताच पोलिसांनी नथवानीला अटक केली आणि हा सर्व प्रकार उघड झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 11:09 pm

Web Title: nagpur raju narang murder case police arrested 5 including 1 minor
Next Stories
1 भीमा कोरेगाव हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई होणारच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2 नांदेडमध्ये पोलिसांच्या लाठीमारात विद्यार्थ्याचा मृत्यू
3 आंबेडकरवादी संघटनांच्या बंदविरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेना आमदाराचा प्रतीमोर्चा
Just Now!
X