20 January 2020

News Flash

‘त्या’ ग्राहकाची दाढी, केस न कापण्याचा नाभिक संघटनेचा निर्णय

मिशी कापल्याने तक्रार करणाऱ्या किरण ठाकूरला दाढी आणि केस कापण्यासाठी वणवण फिरावं लागण्याची शक्यता

(तक्रार करणाऱ्या ग्राहकाचे मिशी कापण्याआधी व नंतरचे छायाचित्र)

पूर्वपरवानगी न घेता मिशी कापल्याने ग्राहकाने नाभिकाविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची अजब घटना नागपुरात काही दिवसांपूर्वी घडली होती. किरण ठाकूर या ग्राहकाने नागपूरच्या कन्हान पोलीस ठाण्याअंतर्गत नाभिकाविरोधात तक्रार केली होती. मात्र, यापूढे तक्रार करणाऱ्या किरण ठाकूरला दाढी आणि केस कापण्यासाठी वणवण फिरावं लागण्याची शक्यता आहे.

कारण, किरणची यापुढे दाढी, केस न कापण्याचा निर्णय ग्रामीण नाभिक संघटनेने घेतला आहे. याशिवाय  ग्रामीण नाभिक संघटनेने याप्रकरणी आंदोलनाचाही इशारा देखील दिला आहे. किरण ठाकूरने यापूर्वीही अनेकदा मिशी कापली होती. पण आता तो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीकरता या प्रकरणाचा गाजावाजा करत आहे, असं ग्रामीण नाभिक संघटनेचं म्हणणं आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

काय आहे प्रकरण –
किरण हा मंगळवारी दुपारी ३ वाजता कन्हानमधीलच फ्रेण्ड्स मेन्स पार्लरमध्ये केस कापण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी केस कापल्यानंतर, दाढी व मिशी केली. दरम्यान पार्लरचे संचालक सुनील लक्षणे यांनी त्यांची मिशीही कापली. दुपारी किरण तेथून निघून गेला. पण रात्री ९.३० च्या सुमारास अचानकपणे त्याने सुनीलच्या मोबाइलवर संपर्क करून न विचारता मिशी कशी कापली, असा जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर किरणने पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी किरणची तक्रार नोंदवून घेतली आहे.

First Published on July 21, 2019 9:28 am

Web Title: nagpur salon owners bans custemer who filed police complaint after mustache shaved sas 89
Next Stories
1 जन्मदात्या बापाची मुलानेच केली निर्घृण हत्या, अकोल्यातील धक्कादायक घटना
2 पावसाचे पुनरागमन ! आज ठाण्यात अतिवृष्टीचा तर कोकणात अतिमुसळधारचा इशारा
3 रायगड जिल्ह्यतील ५६४ शाळाही धोकादायक
Just Now!
X